नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात भिकाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:46 PM2019-07-24T23:46:43+5:302019-07-25T06:16:16+5:30
प्रशासन हतबल : रेल्वे स्थानकांसह उड्डाणपुलाखालील जागेत वाढते वास्तव्य; ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
नवी मुंबई : शहरातील भिकाऱ्यांची वाढती संख्या वाहनचालकांसह सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. महामार्गावरील पुलांखाली तसेच नोडमधील मोकळ्या जागेत त्यांचे टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य पाहायला मिळत आहे; परंतु मागील काही वर्षांत वाढत चाललेल्या या भिकाºयांवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे.
शहरातील सर्वच नोडमध्ये भिकाºयांचा त्रासदायक वावर वाढला आहे. त्यात व्यावसायिक केंद्र असलेल्या भागांसह रहदारीच्या मार्गांचाही समावेश आहे. सिग्नलवर वाहनांची अडवणूक करून भीक मागितली जात आहे. तर बस थांबे व व्यावसायिक दुकाने असलेल्या परिसरात ग्राहकांसोबत किळसवाणे प्रकार करून भीक मागितली जात आहे. यामुळे भिकारी नजरेस पडल्यास नागरिकांना नाइलाजास्तव मार्ग बदलावा लागत आहे. यामुळे शहरवासीयांवर जणू भिकाºयांची दहशत झाल्याचा भास होत आहे. नोडमध्ये टोळ्याटोळ्यांनी वावरणाºया भिकाºयांमध्ये लहान मुलांसह महिलांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यापैकी काही महिलांकडे नवजात बालकेही पाहायला मिळत आहेत. रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारावरही वयस्कर व्यक्ती भीक मागताना आढळून येत आहेत. सकाळच्या वेळी काही व्यक्तींकडून त्यांना त्या ठिकाणी बसवले जात असल्याचेही रेल्वेप्रवाशांच्या पाहणीत आले आहे, त्यामुळे शहरातील भिकाºयांमागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे. तर पळवलेल्या अल्पवयीन मुलांचाही भीक मागण्यासाठी वापर होत असल्याचाही संशय होता. त्या अनुषंगाने वर्षभरापूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी तपासही केला होता; परंतु भिकाºयांमागचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी भिकाºयांच्या विरोधात तीव्र मोहीम हाती घेतली होती. सिग्नलच्या ठिकाणी अथवा शहरात भिकारी दिसताच त्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी केली जात होती. या दरम्यान पोलिसांना भिकाºयांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागले होते. मात्र, काही महिन्यानंतर पोलिसांकडून ही मोहीम थंडावल्यानंतर पालिका प्रशासनानेही त्यात रुची घेतली नाही. परिणामी, सायन-पनवेल मार्गावरील पुलांखालील जागा, तसेच नोडमधील मोकळ्या जागेवर या भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर भिकाºयांची संख्या वाढली आहे.
भिकाºयांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून संबंधितांवर हल्लेही होत आहेत. अशाच प्रकारातून सानपाडा येथे दुकानावर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे पुलाखाली भिकाºयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. त्यांच्याकडून रेल्वेस्थानकासमोरील दुकानाबाहेर ग्राहकांची अडवणूक करून भीक मागितली जात होती, यामुळे दुकानदाराने त्यांना हटकल्याचा राग आल्याने भिकाºयांच्या टोळीने हा हल्ला केला होता; परंतु भिकाºयांचे वास्तव्य असलेल्या जागेच्या हद्दीवादात प्रशासनामध्ये जबाबदारी ढकलण्याचे काम होत असल्याने त्यांना आश्रय मिळत आहे. परिणामी, शहरवासीयांना या भिकाºयांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.