महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसेवकांची संख्या १३ वर; मृतांच्या नावांची यादी
By नारायण जाधव | Published: April 17, 2023 04:29 PM2023-04-17T16:29:30+5:302023-04-17T16:29:39+5:30
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल एका भव्यदिव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई - ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल एका भव्यदिव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळ्यादरम्यान, तीव्र उन्हात जमलेल्या लाखो श्री सदस्यांपैकी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण आजारी पडले आहेत. या घटनेत मृतांची यादी समोर आली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनावर टीका होत आहे.
१) महेश नारायण गायकर (वय ४२)
गाव - वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा मेहंदडी)
२) जयश्री जगन्नाथ पाटील (वय ५४)
गाव - म्हसळा रायगड
३) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय ५१)
गाव- गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन)
४) स्वप्निल सदाशिव केणी (वय ३०)
गाव- शिरसाटबामन पाडा विरार
५) तुळशीराम भाऊ वांगड (वय ५८)
गाव- जव्हार पालघर
६) श्रीमती कलावती सिद्धराम वायचळ (वय ४६), राहणार सोलापूर
७) श्रीमती भीमा कृष्णा साळवी (वय ५८), राहणार कळवा ठाणे
८) श्रीमती सविता संजय पवार (वय ४२), राहणार मुंबई
९) श्रीमती पुष्पा मदन गायकर (वय 64), राहणार कळवा ठाणे
१०) श्रीमती वंदना जगन्नाथ पाटील (वय ६२) राहणार करंजाडे पनवेल
११) मीनाक्षी मिस्त्री (वय ५८) वसई
१२) गुलाब बबन पाटील (वय - ५६) विरार
१३)विनायक हळदणकर- (वय ५५) कल्याण
यांचा समावेश आहे. अद्याप अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत जाहिर केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन भोवळ आल्याच्या घटना घडल्या. त्यात १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी राज्यभरातून लाखो लोक खारघर येथे आले होते. दुपारी दीड दोन वाजेपर्यंत हे लोक मैदानात होते. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने यातील अनेकांना त्रास झाला होता.