अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोमवार, शुक्रवारची सुट्टी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:03 PM2020-02-25T23:03:14+5:302020-02-25T23:03:17+5:30

पनवेल मनपा आयुक्तांचा निर्णय; पाच दिवसांचा आठवडा

Officers, employees close Monday, Friday holidays | अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोमवार, शुक्रवारची सुट्टी बंद

अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोमवार, शुक्रवारची सुट्टी बंद

Next

पनवेल : राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ फ्रेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित शासकीय यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेनेही त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नव्याने परिपत्रक काढत सोमवार व शुक्रवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास मनाई केली आहे.

पाच दिवसांचा आठवडा केल्याने शासकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना शनिवार, रविवार अशी दोन दिवसांची सलग सुट्टी मिळणार आहे. राज्यभरातील शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेने पाच दिवसांच्या आठवड्याचे काटेकोर पालन व्हावे, तसेच पालिकेत येणाºया नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, याकरिता अधिकारी तसेच कर्मचाºयांना सहजरीत्या मिळणाºया सुट्टीवर सोमवार व शुक्रवारी बंदी घातली आहे. शनिवार, रविवार या दोन सुट्ट्यासोबत काही कर्मचारी अथवा अधिकारी अतिरिक्त सुट्टी घेऊन सरसकट तीन दिवस सुट्ट्यांचा बेत करू शकतात, त्यामुळे याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरपालिकेत अद्यापही कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे सलग दोन सुट्ट्यांचा फायदा घेत अतिरिक्त एक दिवसाची रजा वाढविल्यास त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी ही संकल्पना पनवेल महानगरपालिकेत राबविली आहे.

पनवेल महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांच्या व त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी सुधारित वेळ राहणार आहे. सर्व कार्यालयातील शिपाई कर्मचाºयांसाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहणार आहे. दुपारी १.३० ते २ अशी एकूण ३० मिनिटे भोजनाची सुट्टी राहणार आहे.

पाच दिवसांचा आठवडा २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या रजेमुळे अनेक जण सलग तिसºया सुट्टीसाठी किरकोळ रजा टाकून मोकळे होऊ शकतात. याचाच परिणाम पालिकेच्या कामकाजावर होणार असल्याने सोमवार व शुक्रवारी रजेवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक वेळेचे महत्त्व लक्षात घेता ही सुट्टी दिली जाईल.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Web Title: Officers, employees close Monday, Friday holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.