नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झालेली नसून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त जबाबदारी पार पाडत आहेत. उपमहापौर, तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना देण्यात आलेली वाहने महापालिकेकडे जमा करण्यात आली असून, वापर आणि स्वच्छता नसल्याने लाखो रुपयांची वाहने धूळखात पडली आहेत.महापालिकेतील उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आदी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे. या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या वतीने वापरासाठी देण्यात आलेली वाहने महापालिकेकडे जमा करण्यात आली आहेत. महापालिका मुख्यालयातील पार्किंगमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सदर वाहने एकाच जागेवर उभी असून, अनेक वाहनांची नियमित स्वच्छताही केली जात नाही. तसेच संबधित विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे वाहनांवर धूळ साचली असून, बंद असलेल्या वाहनांमध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धूळखात पडली पदाधिकाऱ्यांची वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 11:43 PM