नवी मुंबई : एनएमएमटी बसमधून पडून वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूची घटना सीबीडी येथे घडली आहे. ते बसच्या मागच्या दरवाजाजवळ उभे असताना वळणावर तोल जाऊन बसमधून खाली पडून हा अपघात घडला.भरथन सेखरन (६८), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ते एनएमएमटीच्या उरण - कळंबोली बसमधून प्रवास करत होते. या दरम्यान बस सीबीडी स्थानकालगत आली असता, ते बसच्या मागच्या दरवाजात उभे होते. या वेळी वळणावर बस वेगात वळण घेत असताना त्यांचा हात निसटला. यामुळे तोल जाऊन ते बसमधून खाली पडले असता, गंभीर जखमी झाले होते. मात्र, उचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
धावत्या बसमधून पडून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:40 AM