किरकोळ कारणामुळे वृद्धाची आत्महत्या

By Admin | Published: January 28, 2017 03:06 AM2017-01-28T03:06:27+5:302017-01-28T03:06:27+5:30

आवडता स्वयंपाक न केल्यामुळे पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीच्या (ट्रॉम्बे) माजी कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना

Older suicide due to minor reasons | किरकोळ कारणामुळे वृद्धाची आत्महत्या

किरकोळ कारणामुळे वृद्धाची आत्महत्या

googlenewsNext

नवी मुंबई : आवडता स्वयंपाक न केल्यामुळे पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीच्या (ट्रॉम्बे) माजी कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री कोपरी येथे हा प्रकार घडला असून त्याठिकाणी ते सहकुटुंब राहायला होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्रताप दामोदर ठाकूर (७९) असे त्यांचे नाव आहे. बीएआरसीत ते क्लार्क म्हणून कामाला होते. १९९६ साली सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पत्नी व मुलांसह कोपरीत राहत होते. बुधवारी रात्री आवडती भाजी न बनवल्याने त्यांचे पत्नीसोबत वाद झाला. रस्सा भाजी हवी असतानाही साधी भाजी बनवल्याने प्रताप यांचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर ते त्याच इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये निघून गेले. सदर फ्लॅट त्यांच्या मुलीचा असून ती नोकरीनिमित्ताने विदेशात असल्यामुळे त्याची चावी ठाकूर यांच्याकडेच असायची. अनेकदा एकांत हवा असल्यास प्रताप ठाकूर हे मुलीच्या फ्लॅटमध्ये जावून बसायचे. बुधवारी रात्री देखील भांडणानंतर ते मुलीच्या फ्लॅटमध्ये विश्रांतीसाठी गेले होते. परंतु काही वेळातच सदर फ्लॅटमधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे ठाकूर यांच्या कुटुंबीयांसह इतर रहिवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी आतून बंद असलेल्या दरवाजाचे लॉक दुसऱ्या चावीने उघडले असता आतमध्ये प्रताप यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडला होता. स्वत:च्या परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Older suicide due to minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.