नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरंगुळा केंद्र मिळाल्याने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद, मंदाताई म्हात्रेंचा पाठपुरावा
By नारायण जाधव | Published: January 1, 2024 05:56 PM2024-01-01T17:56:02+5:302024-01-01T17:56:12+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरंगुळा केंद्र मिळाल्याने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवीन वर्षाची सुरुवात नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज असलेल्या "दिवाळे गावात ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करून केली. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या विरंगुळा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरंगुळा केंद्र मिळाल्याने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
यावेळी आमदार म्हात्रे म्हणाल्या की, विरंगुळा केंद्राच्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम सुरू केली आहे. तिच्या माध्यमातून ज्येष्ठांना सकाळी व्यायाम करता यावा, त्यांचे आरोग्य हे निरोगी ठेवता यावे या दृष्टिकोनातून सर्व सुविधायुक्त म्हणून विरंगुळा केंद्राची निर्मिती केल्याचे सांगितले. मतदारसंघातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या योजनांचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मागील काही दिवसांपासून बेलापूर विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दिवाळे गावात बँड प्रशिक्षण केंद्राकरिता समाज मंदिर, गजेबो, सुसज्ज मासळी-भाजी मार्केट अशा अनेक विकासकामांचा उद्घाटनाचा धडाका आमदार म्हात्रे यांनी लावलेला आहे. यानंतर गावातही जी काही विकासकामे प्रस्तावित आहेत ती खऱ्या अर्थाने लवकरच पूर्ण होऊन दिवाळे गावाचे जे स्मार्ट व्हिलेज बनण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेविका भारती कोळी, ज्येष्ठ विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव गंगेश कोळी, खजिनदार एकनाथ कोळी, सदस्य पांडुरंग कोळी, हेमंत कोळी, बळीराम कोळी, फगवाले मच्छिमार अध्यक्ष अनंता बोस, खांदेवाले मच्छिमार अध्यक्ष रमेश हिंडे, नीलकंठ कोळी, डोलकर मच्छिमार सदस्य तुकाराम कोळी, उपजिल्हा संघटक बेलापूर विभाग मनसे भूषण कोळी, उपायुक्त परिमंडळ १ सोमनाथ पोट्रे, उपायुक्त परिमंडळ २ डॉ. श्रीराम पवार, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता विद्युत संजीव पाटील, उप-कार्यकारी अभियंता अजय पाटील, विकास सोरटे, नीलेश पाटील, जी.एल.करणानी, ज्ञानेश्वर कोळी, संतोष कोळी उपस्थित होते.