लाचखोर पोलिसासह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:22 AM2019-05-28T05:22:27+5:302019-05-28T05:22:28+5:30
पान-सुपारीच्या दुकानदारावरील कारवाई टाळण्यासाठी त्याच्याकडून तीन लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचा-यासह एकावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
नवी मुंबई : पान-सुपारीच्या दुकानदारावरील कारवाई टाळण्यासाठी त्याच्याकडून तीन लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचा-यासह एकावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. पोलीस नाईक रामेशवर खताळ व भुरा पाटीदार अशी त्या दोघांची नावे आहेत. खताळ हे एपीएमसी पोलीस ठाण्यात तैनात होते. येथील एका पान-सुपारीच्या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी पान मसाला जप्त केला होता. त्यानंतर होणारी कारवाई टाळण्यासाठी खताळ आणि पाटीदार यांनी तीन लाखांची लाच मागितली. मात्र, ६० हजारांवर तडजोड करण्यात आली. पान-सुपारीच्या दुकानदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.