एकाच दिवशी एनएमएमटीच्या दोन बसचे चाक निखळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:47 PM2019-07-18T23:47:18+5:302019-07-18T23:47:25+5:30

जुईनगर रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी सकाळी एनएमएमटी बसचे चाक निखळले.

On one day, two wheelers of NMMT rocked | एकाच दिवशी एनएमएमटीच्या दोन बसचे चाक निखळले

एकाच दिवशी एनएमएमटीच्या दोन बसचे चाक निखळले

Next

नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी सकाळी एनएमएमटी बसचे चाक निखळले. या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही. खारघरमध्येही सायंकाळी एनएमएमटीच्या बसचे चाक निखळल्याची घटना घडली असून, याविषयी प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची बस एमएच ४३ एच ५२७३ जुुईनगर रेल्वे स्थानकासमोरून सानपाडा सेक्टर ११ मधून जाताना चालकाच्या बाजूचे पुढील चाक अचानक निखळले. बेरिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये बेरिंग बदलण्यात आली होती व ती ४५ हजार किलोमीटरपर्यंत चालणे अपेक्षित होते. अपघातग्रसत बस ३५ हजार किलोमीटरच चालली होती. गत आठवड्यामध्ये संपूर्ण बसची तपासणी करण्यात आली होती. यानंतरही रोडवर चाक निघाल्यामुळे कार्यशाळेत दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याची टीकाही होत आहे. खारघरमध्ये गुरूवारी सायंकाळी एनएमएमटीच्या बसचे चाक निखळले. एकाच दिवशी दोन घटना घडल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.
नेरुळ सेक्टर १० मध्ये चालू बसमधील डिझेल संपले होते. सेक्टर २८ मध्ये बसला लाग लागली होती. सानपाडामध्ये स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बस दुभाजकावर गेली. जुईनगर रेल्वे मार्गावर लोकलला बसने धडक दिली होती. याविषयी आगरशाळेतील अधिकारी विवेक आचलकर यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
>खारघर उड्डाणपुलावर तीन वाहनांना अपघात
खारघर हिरानंदानी उड्डाणपुलावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर गुरुवारी सकाळी तीन वाहनांना अपघात झाला. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले. मुंबईकडे जाणाºया एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तीन कार एकमेकांवर आदळल्या. सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
>प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. बसची दुरुस्ती योग्यप्रकारे झाली पाहिजे.
- समीर बागवान, सदस्य, परिवहन समिती

Web Title: On one day, two wheelers of NMMT rocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.