पनवेल : पनवेल महापालिकेने शहरात खतकुंड्या उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार महापालिका परिसरात १०० हून अधिक खतकुंड्या बांधण्यात येणार आहेत. नुकतीच प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेजवळ एक खतकुंडी उभारण्यात आली आहे. खतकुंड्यांमुळे पालिका हद्दीतील कचºयापासून खत तयार केले जाणार आहे.पनवेल महापालिकेने शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी खतकुंडी प्रकल्प हाती घेतला आहे. खतकुंड्या उभारण्यासाठी अंदाजे २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कचरा कुंड्यांमध्ये नागरिकांनी ओला कचरा आणून टाकायचा आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून उभारण्यात येणाºया खतकुंडीत ओला कचरा टाकवायचा आहे. जवळपास महिना ते दीड महिन्यानंतर या खतकुंड्यांमध्ये खत तयार होणार आहे. १०० किलो कचºयापासून अंदाजे १० ते १५ किलो खत तयार होणार आहे. महापालिका हद्दीत शेकडो बगिचे, उद्याने आहेत. कचºयापासून तयार खताचा बागकामासाठी उपयोग केला जाणार आहे, तर उरलेल्या खताची विक्र ी केली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे खतकुंडी प्रकल्पाचा फायदा पनवेल महापालिकेला होणार आहे.पनवेल शहरात दररोज जवळपास ५० टन तर महापालिका हद्दीत दररोज ४०० टन कचरा जमा होतो. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी व वाहतुकीवर मोठा खर्च होतो. खतकुंड्यांमुळे कचºयावरील खर्चात कपात होणार आहे.
पनवेल महापालिका बांधणार शंभर खतकुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:53 AM