सानुग्रह अनुदानामध्ये एक हजाराची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:50 AM2018-10-21T02:50:54+5:302018-10-21T02:51:21+5:30
महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना २३ हजार व ठोक मानधनावर असलेल्यांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना २३ हजार व ठोक मानधनावर असलेल्यांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या रकमेमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्यामुळे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाºयांना दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देता यावे, यासाठी अर्थसंकल्पामध्ये १० कोटी २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. कायम कर्मचाºयांना १७ हजार रुपये व ठोक मानधनावरील कर्मचाºयांना ९५०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी सर्व सदस्यांच्या सहमतीने कायम कर्मचाºयांच्या रकमेमध्ये तब्बल पाच हजार रुपयांची वाढ करून २२ हजार रुपये देण्याच्या प्रस्ताव मंजूर केला होता. ठोक मानधनावरील कर्मचाºयांना ९५०० रुपयांची तरतूद होती, त्यामध्ये स्थायी समितीने साडेसहा हजार रुपयांची वाढ करून १७ हजार रुपये अनुदान केले होते.
सर्वसाधारण सभेमध्ये किती वाढ होणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले होते. प्रस्तावावर सदस्य काय भूमिका घेणार याची उत्सुकता असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी प्रेक्षागॅलरीमध्ये गर्दी केली होती. महापौर जयवंत सुतार यांनी कायम व ठोक माधनावरील कर्मचाºयांच्या सानुग्रह अनुदानामध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. कायम कर्मचाºयांना २३ हजार व ठोक मानधनावरील कर्मचाºयांना १७ हजार रुपये मिळणार आहेत. पनवेल महापालिकेपेक्षा दुप्पट रक्कम पालिका कर्मचाºयांना मिळणार आहे.