सूर्यकांत वाघमारे/ ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 5 - गुरुवारी मध्यरात्री 2 वाजन्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर 1 येथील मशिदीत मध्ये एकाची हत्या झाली. झोपन्याच्या जागेवरून त्यांच्यात भांडन झाल्याचे पोलीसांनी संगीतले. इस्तियाक अहमद रोशन अली शेख (५५) असे मयत व्यक्तिचे नाव आहे. मयत व त्यांचा भाऊ हे दोघे ज्याठिकानी काम करतात तिथल्या मालकाने त्यांना झोपन्यासाठी मशीद मध्ये पाठवले होते. मात्र हे दोघे त्याठिकानी गेले असता तिथे अगोदरच झोपलेल्या गुलाम नबी अहमद (४०) याने त्यांना विरोध केला. यावरुन त्यांच्यात भांडन झाले असता, ग़ुलाम याने इस्तियाक च्या डोक्यात माईक चा स्टैंड मारला. यामध्ये इस्तियाक चा जागिच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिलताच उपायुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त दिलीप माने यांनी घटनास्थलाची पाहनी केली. याप्रकरणी ग़ुलाम अहमद याच्या विरोधात रबाळे पोलीसठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर ग़ुलाम हा फ़रार झाला असून, त्याचा शोध सुरु असल्याचे उपायुक्त प्रशांत ख़ैरे यांनी संगीतले.