पामबीच रोडवरील भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:58 PM2020-06-25T23:58:55+5:302020-06-25T23:59:02+5:30
बुधवारी मध्यरात्री वॅगनआर कारचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तर तिनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.
नवी मुंबई : पामबीच रोडवर बुधवारी मध्यरात्री वॅगनआर कारचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तर तिनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.
वाशीकडून बेलापूरला जाणाऱ्या लेनवर रात्री दिड वाजण्याच्या सुमारास आ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. कारने पुढील वाहनांना धडक दिली व मागील वाहनेही कारवर धडकली. कारचे पुढील व मागील दोन्ही बाजूने मोठे नुकसान झाले आहे. अपघातामध्ये स्टॅलीन नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरीत तिन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून पामबीच रोडवरील वाहनांची संख्याही कमी झाली आहे. सिग्नल यंत्रणा व्यवस्थीत काम करत नाही. अनेक वेळा रात्री विद्यूतयंत्रणा बंदच असते. त्यामुळे अपघाताला अमंत्रण मिळत आहे.
>नियमांचे होतेय उल्लंघन
वाहन चालकही वेगाने वाहने चालवत असल्यामुळे या रोडवरील अपघाताचा धोका वाढला आहे. लॉकडाउनचे नियम शिथील झाल्याने वाहनधारक वेगाने वाहने चालवित आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांविराधात कारवाईची मागणी होत आहे.