कळंबोली : कळंबोली बॉम्ब प्रकरणातील तीन आरोपींना नवी मुंबईच्या विशेष पोलीस पथकाने अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, लॅपटॉप व इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या. शुक्रवारी पोलिसांना नेवाळी येथील चाळीतील एका खोलीत आणखी एक बॉम्ब सापडला.काही दिवसांपूर्वी कळंबोली वसाहतीतील सुधागड शाळेसमोरील बांधकामाजवळ एका हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळली होती.
बांधकाम व्यावसायिकाला घाबरवण्यासाठी आरोपींनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. संबंधितांनी नेवाळी येथील एका खोलीत बॉम्ब बनवल्याचे ही तपासात स्पष्ट झाले होते. आरोपी दीपक दांडेकर याच्या वडिलांच्या मालकीची दगडखाण असल्याने त्याला स्फोटकासाठी लागणाऱ्या सामानाची माहिती होती. बॉम्ब बनवण्यासाठी नेवाळी गावातील काथारा चाळीतील जागा त्यांनी भाड्याने घेतली होती.
याठिकाणी तीन महिन्यांपासून बॉम्बस्फोटाचा कट शिजत होता. चाळीतील त्या खोलीवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यासह, क्राइम ब्रँच पथक, एटीएस पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांनी शुक्रवारी धाड टाकली. घरात निळा पिंप सापडला. यामध्ये विविध स्फोटके ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर एक जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आल्याचे समजते.आरोपींना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडीपनवेल : कळंबोली येथे बॉम्ब ठेवणाºया सुशील प्रभाकर साठे (३५, पुणे), मनीष लक्ष्मण भगत (४५) आणि दीपक नारायण दांडेकर (५५, उलवे) या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.