नवी मुंबई : विजेची चोरी केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलीसठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोनकोडे येथील एका इमारतीमधील आठ घरांना वर्षभरापासून चोरीच्या मार्गाने वीज वापरली जात होती. पाहणीमध्ये हा प्रकार निदर्शनास येताच सदर घरांच्या मालकाविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे.
उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने नियमित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर ताण पडत असतो. त्या अनुषंघाने अनधिकृत वीजजोडण्या शोधण्याचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केले जाते. त्याप्रमाणे बोनकोडे सेक्टर १२ डी येथे महावितरणचे सहायक अभियंता संजय काटकर यांच्यामार्फत पाहणी सुरू होती. या वेळी तिथल्या एका इमारतीमध्ये १२ घरे असून अवघे चार मीटर घेण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे प्रत्येक घराच्या मीटर जोडणीची पाहणी केली असता, आठ घरांना अनधिकृत वीजजोडणी असल्याचे आढळून आले.
मागील वर्षभरापासून त्यांच्याकडून चोरीची वीज वापरली जात होती. सदर आठही घरे सय्यद शाबी अहमद यांच्या मालकीची असून, ती भाड्याने देण्यात आलेली आहेत. यामुळे वीजचोरी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात महावितरणतर्फे कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याआधारे सय्यद अहमद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वर्षभरापासून चोरीची वीज वापरल्याप्रकरणी त्यांना दोन लाख आठ हजार रुपयांचे बिलही आकारण्यात आले आहे.
बोनकोडे परिसरात इतरही अनेक ठिकाणी अशा प्रकारे वीजचोरी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यापैकी काही व्यावसायिक गाळे असून त्यांना रस्त्यालगतच्या वीजखांबांमधूनही वीज चोरली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा वीजचोरांवरही कारवाईची मागणी होत आहे.च्बोनकोडे परिसरात इतरही अनेक ठिकाणी अशा प्रकारे वीजचोरी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यापैकी काही व्यावसायिक गाळे असून त्यांना रस्त्यालगतच्या वीज खांबावरून चोरली जात