दहा हजार नागरिकांमागे एक पोलीस
By admin | Published: November 16, 2015 02:14 AM2015-11-16T02:14:38+5:302015-11-16T02:14:38+5:30
ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत
राजू काळे, भार्इंदर
ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. सुमारे १० हजार नागरिकांमागे एक पोलीस सुरक्षेचे काम पाहत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यास लागून असलेल्या मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असून येथील लोकवस्तीदेखील दिवसेंदिवस विस्तारत आहे. या वाढत्या लोकवस्तीत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्या वास्तव्य करीत असून त्यात स्थलांतरित लोकांची आणखी भर पडत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सुरुवातीला तीन पोलीस ठाणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांची संख्या एकामागोमाग वाढत जाऊन आजमितीस ती सहावर पोहोचली आहे. त्यांच्या हद्दीत सरासरी लोकसंख्येची घनता लाखोंच्या घरात असून सुरक्षिततेसाठी सुमारे ४० ते १२० कर्मचारी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ४ ते २० कर्मचारी अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालयीन कामकाजाकरिता नियुक्त केल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काही जण साप्ताहिक सुटी व हक्काच्या रजेवर जात असल्याने दैनंदिन कामकाजाकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यात सुमारे ३० ते ४५ कर्मचारीच उपलब्ध होत असतात. त्यांना प्रत्येकी १२ तासांच्या दोन पाळ्यांत काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार नागरिकांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळावरून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. राज्य शासनाकडून मार्च २०१४ च्या अध्यादेशानुसार ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ४५२ पदे मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावर स्पष्ट केले.