एपीएमसीमध्ये प्रथमच एसटीमधून कांद्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:34 AM2020-06-10T05:34:37+5:302020-06-10T05:34:45+5:30

पहिलाच प्रयोग : ट्रकपेक्षा भाडे कमी

Onion import from ST for the first time in APMC | एपीएमसीमध्ये प्रथमच एसटीमधून कांद्याची आवक

एपीएमसीमध्ये प्रथमच एसटीमधून कांद्याची आवक

Next

नवी मुंबई : कोरोनामुळे कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनी भाडेवाढ केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकºयाने चक्क एसटी बसमधून कांदे विक्रीसाठी मुंबई बाजार समितीत पाठविले. पहिल्यांदाच एसटीने कांदे मार्केटमध्ये आल्याने दिवसभर एपीएमसीमध्ये याचीच चर्चा सुरू होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकदा मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मालाची विक्री करता आली नाही. वाहतुकदारांनी भाडेवाढ केल्याने खर्च वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुक्यातून मुंबईत कांद्याचा ट्रक पाठविण्यासाठी १६ हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. यामुळे काही शेतकºयांनी एसटी महामंडळाशी संपर्क साधत चक्क एसटीमधून कांदा मुंबई बाजार समितीत पाठविला. ट्रकच्या तुलनेत त्यांची ३ हजार रुपयांची बचत झाली.

एपीएमसीमध्ये पहिल्यांदाच एसटीमधून माल आल्याने सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय झाला होता. लॉकडाऊनच्या काळात ट्रक चालकांनी भाडेवाढ केली असल्याने शेतकºयांनी एसटीची मदत घेतली.
- नवनाथ गावडे, व्यापारी, एपीएमसी

Web Title: Onion import from ST for the first time in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.