शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार?
2
"विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!", विजय वडेट्टीवारांची खोचक टीका  
3
“राहुल गांधींनी कॅट वॉक करायला आषाढी पालखी सोहळ्यात येऊ नये”; भाजप नेत्याची खोचक टीका
4
गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती रुपये मोजावे लागणार?
5
एकेकाळी दिवसरात्र काम करून कमवायची १२० रुपये; आता आहे कोट्यवधींची मालकीण
6
शिवसेनेच्या नेत्यावर पंजाबमध्ये जिवघेणा हल्ला! शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी
7
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार, मंत्री सावेसह शिंदेसेनेच्या शिरसाटांना धक्का
8
सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका
9
Bajaj Freedom 125 CNG Bike: शॉकिंग मायलेज! बजाजच्या जगातील पहिल्या CNG Bike ची किंमत जाहीर; पहा फिचर्स, फर्स्ट लूक...
10
Video: माँ की ममता! 'जग जिंकून आलेल्या' रोहित शर्माला जेव्हा माऊली जवळ घेते तेव्हा...
11
"प्यार करोगे तो…", शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
Form 16 देण्यास तुमचं ऑफिस टाळाटाळ करतंय का? ITR Filing साठी स्वत:च करा Online Download
13
अजित पवार लवकरच अमित शाहांची भेट घेणार; काय असेल कारण?
14
'मेक इन इंडिया'ची कमाल! देशाच्या संरक्षण उत्पादनात 16% वाढ; राजनाथ सिंह यांची माहिती...
15
मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!
16
तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या BRSला सुरुंग, खासदारानंतर ६ आमदारही फोडले
17
जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळा मूड दिसतो, अजितदादा म्हणाले, "जबाबदारी वाढल्यावर.." सभागृहात टोलेबाजी
18
Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू
19
Virat Kohli Rohit Sharma: "रोहित रडत होता, मी रडतो होतो अन् मग.."; विराटने सांगितली 'त्या' खास क्षणाची आठवण
20
Microsoft मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, 'या' विभागातील सर्वाधिक लोकांना बसला फटका

माथाडींनी धडक देताच कांदा-बटाटा मार्केटचे पाणी सुरू; कामगार समाधानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 6:14 AM

हमीपत्र देण्याच्या अटीवर पुरवठा झाला पूर्ववत; कामगार समाधानी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इमारत धोकादायक असल्याने खबरदारीची म्हणून नवी मुंबई पालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या  कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून माथाडी  कामगारांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेअंती व्यापारी हमी पत्र देण्याच्या अटीवर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा सुरू केला. 

मार्केट परिसरात व्यापारी, माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालिकेकडे बोट दाखविले होते. 

शिंदेसेनेनेही प्रशासनाला धरले धारेवरकांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व्यापाऱ्यांनी शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना सांगितल्या. त्यानुसार नाहटा यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. 

‘दुर्घटना घडल्यास आम्हीच जबाबदार’- कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले.- त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरित सुरू, असे सांगितले. आयुक्तांची अट माथाडी कामगारांनी मान्य केली असून, येत्या दोन दिवसांत हमी पत्र द्यायचे आहे. बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू झाल्याने व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई