नवी मुंबई : फेब्रुवारी ते जूनदरम्यान राज्यात कांद्याला समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. जुलैच्या सुरुवातीपासून काही प्रमाणात भाव वधारले असल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पसा दिलास मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये १० ते १८ रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारीमध्ये कांद्याला १३ ते २२ रुपये प्रति किलो भाव मिळत होता; परंतु फेब्रुवारीपासून भाव घसरण्यास सुरुवात झाली.
नाफेडमुळे वाढला भाव
एप्रिल व मे महिन्यात ५ ते ११ रुपये दराने कांद्याची विक्री होत होती. शेतकऱ्यांना उत्पादन व वाहतूक खर्च वगळला तर हातामध्ये फारसा मोबदला मिळत नव्हता. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही अशीच स्थिती होती. नाफेडने कांदा खरेदी केल्यानंतर काही प्रमाणात भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी मुंबई बाजार समितीमध्ये १२९८ टन आवक झाली असून कांदा १० ते १८ रुपये किलो दराने विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मुंबई बाजार समितीमधील महिनानिहाय बाजारभाव महिना प्रतिकिलो भाव जानेवारी १३ ते २२ फेब्रुवारी ९ ते १५ मार्च ७ ते १३ एप्रिल ७ ते ११ मे ५ ते ११ जून ५ ते १४ जुलै १० ते १८
राज्यातील ५ जुलैचे बाजारभाव बाजार समिती बाजारभाव पुणे ७ ते १७ कोल्हापूर ५ ते १८ चंद्रपूर १० ते २५ अमरावती १० ते २७ नागपूर १५ ते २० पिंपळगाव बसवंत ४ ते २४ औरंगाबाद २ ते १५ येवला ३ ते १५