लोकमत न्यूज नेटवर्करोहा : आॅनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुशिक्षित मंडळी आॅनलाइन फसवणुकीला अधिक बळी पडल्याचे दिसून येत आहे. रोह्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. देवेंद्र जाधव यांची देखील तीन भामट्यांनी आॅनलाइन फसवणूक करून ६८,८७८ लंपास केल्याचे उघड झाले आहे. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉ. जाधव यांनी २०१२ मध्ये रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीचे पुढील हप्ते न भरल्याने विमा पॉलिसी बंद झाली होती. याचाच फायदा घेत एप्रिल २०१७ च्या पहिल्या आठवड्यात रोहित, अंकित व अमित या तिघांनी फोन करून तुमची बंद पडलेली पॉलिसी वन टाइम सेटलमेंट करण्याची नवीन पध्दत सुरू झाली आहे, असे सांगत त्यांच्या बँक खात्यावरून ६८,८७८ रुपये काढले. याबाबत डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी लाइफ इन्शुरन्स कंपनीत संपर्क केला असता, अशा प्रकारची कोणतेही स्कीम राबवित नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरजाधव यांनी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रोह्यातील डॉक्टरची आॅनलाइन फसवणूक
By admin | Published: May 16, 2017 12:00 AM