सुरक्षारक्षक भरतीत ऑनलाइन गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:46 PM2019-07-17T23:46:37+5:302019-07-17T23:46:48+5:30
मागील अनेक वर्षांपासून रखडलेली सुरक्षारक्षक भरती सुरू झाली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : मागील अनेक वर्षांपासून रखडलेली सुरक्षारक्षक भरती सुरू झाली आहे. सुमारे एक हजार जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रि या पारदर्शक होण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. परंतु तांत्रिक कारणामुळे अनेक उमेदवारांना अद्याप याबाबतचे एसएमएस मिळालेच नसल्याने उमेदवारांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
मागील दोन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु आहे १९ जुलै याकरिता शेवटची तारीख आहे . एक हजार जागांसाठी सुमारे १४ हजार अर्ज रायगड सुरक्षा महामंडळाला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या देखील यामध्ये मोठी आहे . राज्य सरकारच्या आदेशाने यावर्षी आॅनलाइन प्रक्रि या पार पडत आहे. त्यानुसार हजारो संख्येने उमेदवारांनी आपली नोंदणी या संकेतस्थळावर केली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी एसएमएस प्राप्त होत आहेत. मात्र अनेकांनी एसएमएस प्राप्त होत नसल्याची तक्र ार सध्याच्या घडीला उमेदवारांकडून केल्या जात आहेत. नाव न छापण्याच्या अटीवरून अनेक उमेदवार ही तक्र ार केली आहे. या भरती प्रक्रि येत तांत्रिक कारणांमुळे अडथळा तर निर्माण होत नाही ना ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची सुरक्षा मंडळाकडून मैदानी परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर सुरक्षा मंडळाद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मंडळाच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी, खासगी, रेल्वेस्थानक, सिडको आदी कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
>उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठीचे एसएमएस प्राप्त होत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी इंटकच्या माध्यमातून घेतली जाईल. दरम्यान, ही भरती प्रक्रि या पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडावी.
- महेंद्र घरत,
कामगार नेते
>भरती प्रक्रि या पारदर्शकपणे पार करण्यासाठी आॅनलाइन प्रक्रि येचा अवलंब करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी एसएमएस प्राप्त होणार आहेत. ज्या उमेदवारांनी फी भरली नसेल त्यांना एसएमएस पाठविण्यात आले नाहीत.
- दिनेश दाभाडे,
अध्यक्ष,
रायगड सुरक्षा मंडळ