पनवेल महानगरपालिकेकडून गणेश मंडळांना आॅनलाइन परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:24 AM2017-08-12T06:24:19+5:302017-08-12T06:24:19+5:30
पनवेलमधील गणेश मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी आता वारंवार खेटे घालण्याची गरज भासणार नाही. पनवेल महानगरपालिकेने मंडळांना परवानगी देण्यासाठी पोर्टल तयार केले असून आॅनलाइन अर्ज करून परवानगी मिळवता येणार आहे.
पनवेल : पनवेलमधील गणेश मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी आता वारंवार खेटे घालण्याची गरज भासणार नाही. पनवेल महानगरपालिकेने मंडळांना परवानगी देण्यासाठी पोर्टल तयार केले असून आॅनलाइन अर्ज करून परवानगी मिळवता येणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिका कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आली.
पनवेल महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळांना गणेशोत्सवाची परवानगी घ्यायची असल्यास स्रूेूाी२३्र५ं’.ूङ्मे ही वेबसाइट विकसित केली आहे. यावर अर्ज करण्यासाठी आवश्यक ती माहिती मंडळाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ही वेबसाइट लॉग इन करण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन, महावितरण यांना लॉग इन आयडी देण्यात आले आहेत. महापालिकेने आलेले अर्ज मंजूर केल्यानंतर अर्ज पुढील परवानग्यांसाठी पुढे पाठविण्यात येईल. त्यानंतर पोलीस, वाहतूक पोलीस जागेची पाहणी करून त्यांच्या विभागाचे मत त्या अर्जांवर आॅनलाइन मांडेल. सर्व विभागांनी आॅनलाइन प्रक्रि या पूर्ण केल्यानंतर महापालिका या अर्जांला अंतिम मंजुरी देणार आहे. ही सगळी प्रक्रि या ४ दिवसांत पूर्ण होईल असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. आॅनलाइन अर्ज करण्यास अडथळे येत असल्यास महापालिकेने आॅफलाइनची देखील सोय केली आहे. महापालिका मंडळाकडून डिपॉझिट म्हणून ५ हजार रुपये तर फी म्हणून १ हजार रुपये घेणार आहे. तसेच सरसकट बॅनर लावण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
पालिकेच्या निर्णयाला उशीर
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येवून ठेपला आहे. या उत्सवाचे आयोजन करणाºया गणेश मंडळांची महिनाभरापूर्वीच विविध परवानग्यासाठी धावपळ सुरू असते. अनेक मंडळांनी धावपळ करून परवानग्या देखील मिळविल्या आहेत तर काही मंडळांची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने त्यांनी पालिके चा हा निर्णय चांगला आहे मात्र तो वेळेवर घेणे गरजेचे होते. यासंदर्भात पालिकेने अगोदर माहिती देणे देखील गरजेचे होते अशी प्रतिक्रिया खारघरमधील काही मंडळांच्या प्रतिनिधींनी दिली.