शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वॉक विथ कमिशनरमध्ये फक्त नऊच तक्रारी

By admin | Published: February 19, 2017 3:48 AM

तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये आयोजित वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी बघ्यांची गर्दी जमली होती; पण त्यामधील फक्त ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्त तुकाराम मुंढे

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये आयोजित वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी बघ्यांची गर्दी जमली होती; पण त्यामधील फक्त ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाठ फिरवताच परिसरातील बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली असून रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्तांनी सिडको विकसित नोडनंतर आता झोपडपट्टी परिसरात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे; पण आयुक्त झोपडपट्टी परिसरात येणार असल्याने आनंद होण्याऐवजी रहिवाशांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. पहिलाच उपक्रम यादवनगरमध्ये राबविण्यात आला व दुसऱ्या दिवसापासून त्या परिसरातील बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई करताना अतिश्रमामुळे पालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नांगरे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. या नंतर ११ फेब्रुवारीला दुसरा दौरा तुर्भे स्टोअर्समध्ये घेण्यात आला होता; पण नागरिकांमध्ये असंतोष असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने ‘वॉक विथ कमिशनर’ला स्थगिती देण्यात आली होती. १८ तारखेला हा उपक्रम राबविण्यात आला. पालिका शाळेच्या बाहेर आयुक्तांनी रहिवाशांशी संवाद साधला. आयुक्त काय भूमिका घेणार हे पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती; पण प्रत्यक्षात ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्तांच्या उपक्रमाला मिळालेला हा सर्वात अल्प प्रतिसाद आहे. आयुक्तांकडे सुविधा मागण्यासाठी गेल्यास ते अतिक्रमणावर बोट ठेवणार व आपल्या झोपड्या हटविणार या भीतीने नागरिकांनी तक्रारी न देणेच पसंत केल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांची संवाद साधताना आयुक्तांनी पालिकेने सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना नळजोडणी सुरू केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये अनुदान दिले जात असल्याची माहिती दिली. तुर्भे डम्पिंग ग्राऊंड देशातील आदर्श प्रकल्प असल्याचेही त्यांनी या वेळी रहिवाशांना सांगितले. सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना शासनाने अभय दिले असून त्या व्यतिरिक्त झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी पाठ फिरविताच महापालिका प्रशासनाने या विभागातील नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई सुरू केली. झोपड्यांच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बसविण्यात आलेल्या शिड्या तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्त तक्रारी निवारणासाठी आले होते की तक्रारी वाढविण्यासाठी असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रचारासाठी शहराबाहेर असल्याने ‘वॉक विथ कमिशनर’मध्ये काय झाले ते समजले नाही; परंतु आयुक्त जाताच बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रहिवाशांवर अशाचप्रकारे अन्याय सुरू राहिला तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. - सुरेश कुलकर्णी,नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस