नवी मुंबईमध्ये डेंग्यूचा वर्षभरात फक्त एकच रुग्ण, साथीचे आजार झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:44 AM2021-02-03T02:44:02+5:302021-02-03T02:44:32+5:30

Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून २६ जणांना मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Only one dengue patient in Navi Mumbai during the year | नवी मुंबईमध्ये डेंग्यूचा वर्षभरात फक्त एकच रुग्ण, साथीचे आजार झाले कमी

नवी मुंबईमध्ये डेंग्यूचा वर्षभरात फक्त एकच रुग्ण, साथीचे आजार झाले कमी

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून २६ जणांना मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये साथीच्या अजारांच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुुंबईमध्येही प्रत्येक वर्षी पावसाळा, हिवाळ्यामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत असते. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी व्हायची. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोसायटींमध्ये वारंवार औषधे फवारली जात आहेत. सॅनिटायझर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व आहारामध्ये केलेले बदल यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २०१९ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.  

मलेरियाचे ५२ रुग्ण 
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात  २०१९ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.  २०२०  मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मलेरियाचे ५२ रुग्ण होते ते २६वर आले  आहेत. मलेरिया व डेंग्यूसदृश तापाच्या  रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.  नागरिक आरोग्याची काळजी घेऊ लागले 
आहेत. यामुळे आजारांचे प्रमाण कमी  झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली  आहे. 

डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; गतवर्षी ३९,६७८ पाण्याच्या टाक्यांची तपासणी 
महानगरपालिकेच्यावतीने डेंग्यू व मलेरियाविषयी शहरभर सर्वेक्षण करण्यात येते. डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करण्यात येतात. संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील इतर घरांचेही सर्वेक्षण करण्यात येते. गतवर्षी ३९६७८ पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. २६ हजारपेक्षा जास्त ड्रम, १७ हजारपेक्षा जास्त टायर तपासण्यात आले. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती लक्षात आली त्या ठिकाणी औषध फवारणी केली. बांधकाम व्यवसायिक व इतर व्यवसायिकांच्या निष्काळजीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येते. डेंग्यू व मलेरिया सदृश तापाच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात येते. 

डेंग्यूची लक्षणे
 अचानक तीव्र 
ताप येणे
 तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी
 अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व 
तोंडाला कोरड 
पडणे
 उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणे
 ताप कमी-जास्त हाेणे, अंगावर 
पुरळ येणे

Web Title: Only one dengue patient in Navi Mumbai during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.