संकटावर मात करणे हाच पुरूषार्थ
By admin | Published: January 25, 2017 05:06 AM2017-01-25T05:06:18+5:302017-01-25T05:06:18+5:30
परिस्थिती कशीही, कोणतीही असो, संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत
पनवेल : परिस्थिती कशीही, कोणतीही असो, संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय कुवळेकर यांनी केले.
पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शनिवार कृ. प्र. खाडीलकर लिखित ‘संगीत स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. रविवारी उद्योजक जे.एम.म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात अमृत योगी सभासदाचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे कार्यकरी संपादक विनायक पात्रुडकर, संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, उपाध्यक्षा शामल आंग्रे व सभासद हजर होते. विजय कुवळेकर यांचा 65 वा वाढदिवस असल्याने त्यांना मंडळाने शुभेच्छा दिल्या. कुवळेकर यांनी, पत्रकारितेच्या क्षेत्रात व शासकीय कामकाजात काम करताना आलेल्या अनुभवचे किस्से यावेळी सांगितले. आपली बाह्य इंद्रिये जेव्हा बंद होतात त्यावेळी अंतचक्षू आदी इंद्रिये कार्यरत होत असतात. समोरच्या संकटावर मात करणे हाच खरा पुरषार्थ असतो, हे घडलेल्या प्रसंगानुरूप किस्से सांगून पटवून दिले. माहिती अधिकारचे आयुक्त असताना घडलेले शासकीय कामकाजाचे किस्से ही त्यांनी यावेळी संगितले. कार्यक्र माचे नियोजन व शिस्त पाहून त्यांनी कौतुक केले.
कार्यक्र माचे अध्यक्ष व उद्योजक जे.एम.म्हात्रे यांनी, ज्येष्ठ नागरिक संघासाठी जागा उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पडले होते. संघाने परिश्रमाने व जिद्दीने त्याचे सोने करून सुंदर सभागृह उभारून दाखवले याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी २० जेष्ठ नागरिकांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रदीप भुंजे यांनी कार्यक्र माचे सूत्र संचालन केले.
(प्रतिनिधी)