पनवेल: करंजाडे सेक्टर 5 मध्ये उघड्या गटारावरील झाकणे गायब झाल्याने रविवारी म्हैस या गटारात अडकल्याची घटना घडली.अग्निशमन दलाने शर्तींचे प्रयत्न केल्याने या म्हैसला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.
करंजाडे नोड सिडकोच्या अखत्यारीत येते.नव्याने वसवलेल्या या नोड मध्ये प्राथमिक सिविधांचा मोठा आभाव आहे.पाणी,रस्ते,उघडी गटारे या सर्वच समस्यांची ओरड पहावयास मिळत असतात.उघड्या गटारात जनावरे अडकण्याची अथवा पडण्याच्या घटना शहरात वाढत आहेत.मागील महिन्यात देखींच अशाच प्रकारे म्हैस गटारात अडकली होती.स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलावल्यावर त्या म्हैशीला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.
रविवारची घटना देखील मागील घटनेची पुनरावृत्ती करणारी ठरली.वारंवार घडणा-या या प्रकारावरून राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष करंजाडे शहराध्यक्ष रंजित नरुटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सिडकोच्या गलथान कारभाराचा फटका मुक्या जनावरांना सोसावा लागत असल्याचा आरोप नरुटे यांनी केला.एखादा नागरिक गटारात अडकल्यावर सिडको प्रशासनाला जाग येईल का ? असाही प्रश्न नरुटे यांनी उपस्थित केला आहे.