शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुटखा विक्रीचे रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:31 AM

पाच जणांविरोधात गुन्हा; बाजार समितीत पोलिसांसह एफडीएची कारवाई

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, एपीएमसी पोलीस स्टेशनसह अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, ४२५८० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये मुस्ताक मोहम्मद अन्वार, राजन कुमार गौरीशंकर गुप्ता, धर्मेंद्र जगदीश शहा, मोहन गोपाळ पाल व प्रमोद कुमार आर्य अशी त्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने पानटपऱ्यांवर धाड टाकून राजश्री पानमसाल्याच्या ३०० पुड्या, एसएचके पान मसाल्याच्या ३३० पुड्या, विमलच्या १२००, सुधा प्लस पानमसाला ६५० पुड्या हस्तगत केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी योगेश ढाणे यांनी संबंधितांविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. राज्य शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही मुंबई बाजार समितीमध्ये बिनधास्तपणे गुटखा विक्री केली जात होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला राजन उर्फ मुन्ना गुप्ता व त्याचा भाऊ राकेश हे दोघे पानटपºयांना गुटखा पुरवत असल्याचे बाजार समितीमधील अधिकारी व कर्मचारी खासगीमध्ये बोलत होते. गुप्ता बंधूंनी मार्केटमध्ये अनेक पानटपºया चालविण्यासाठी घेतल्या असल्याचेही बोलले जात होते. गुटख्याची बिनधास्त विक्री सुरू असूनही प्रशासन काहीही कारवाई करत नव्हते. येथील गुटखा विक्रीविषयी ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. स्टिंग आॅपरेशन करून गुटखा विक्रीचे वास्तव निदर्शनास आणून दिले होते. यानंतर सुरक्षारक्षकांनी काही पानटपरी चालकांवर कारवाई करून गुटखा जप्त केला होता; परंतु नंतर पुन्हा संबंधितांना विक्रीसाठी छुपा पाठिंबा दिला होता.बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगार, शेतकरी व इतर घटकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा, यासाठी छोटे स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत; परंतु बहुतांश स्टॉल्समध्ये गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक स्टॉल्स मूळ मालकांनी इतरांना भाडेतत्त्वावर दिले आहेत.एका वर्षापूर्वी टपºयांमध्ये गांजाही विकला जात होता. याविषयी आवाज उठविल्यानंतर गांजाची खुलेआम विक्री थांबली आहे; परंतु अद्याप अनेक जण चोरून गांजा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मार्केटमध्ये गुटखा कोण आणतो, याची पूर्ण माहिती प्रशासनाला आहे. यानंतरही संबंधितांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर अमली पदार्थ विरोधी पथक, एपीएमसी पोलीस स्टेशन, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर येथील रॅकेट उघडकीस आले आहे. बाजार समिती प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई