सरसगडावर नाचविल्या उघड्या तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:32 PM2020-12-29T23:32:15+5:302020-12-29T23:32:19+5:30
गडकिल्ल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, तेथे शिवभक्त जावेत व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे, या उद्देशाने वेध सह्याद्रीतर्फे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
पाली : वेध सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे २४ व २५ तारखेला येथील सरसगड किल्ल्यावर श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी उघड्या तलवारी नाचविण्याचा प्रकार घडला, तसेच या कार्यक्रमासाठी पाली पोलीस स्थानकाची परवानगी घेण्यात आली नव्हती. यावेळी भंडारा उधळत कोरोनाच्या नियमांना फाटा देण्यात आला.
गडकिल्ल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, तेथे शिवभक्त जावेत व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे, या उद्देशाने वेध सह्याद्रीतर्फे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी गडावर दिशादर्शक फलक व किल्ल्याच्या नकाशाचे फलक लावण्यात आले. मात्र, तलवारी नाचविल्याने व कोरोनाच्या नियमांना फाटा दिल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय झाला आहे. सर्व निट केल्यानंतर असा गोंधळ नको अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.