शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सेंट्रल पार्कचे लोकार्पण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:07 AM

पालिकेच्या वतीने घणसोलीत सुरू असलेल्या सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाणार आहे

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने घणसोलीत सुरू असलेल्या सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या अनुषंगाने तिथल्या कामांची पाहणी आमदार संदीप नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी पार्कमधील कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या.घणसोली सेक्टर ३ येथे पालिकेच्या वतीने भव्य सेंट्रल पार्क उभारणीचे काम सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामात सुरुवातीच्या दोन वर्षांत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षभरात प्रत्यक्षात कामाला गती मिळाली आहे. या पार्कच्या कामासाठी आमदार संदीप नाईक यांनी महापालिकेला राज्य शासनाचाही निधी मिळवून दिलेला आहे. त्यानुसार पंचमहाभुतांवर आधारित संकल्पनेनुसार हे पार्क विकसित केले जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात भूखंड हस्तांतरणाचा तिढा व त्यानंतर दोनदा रचनेत झालेला बदल यामुळे पार्कच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. यामुळे कामासाठी देण्यात आलेला कालावधी संपल्याने दिलेल्या मुदतवाढीत पार्कचे काम पूर्ण होत आहे. त्याकरिता घाईमध्ये होणाºया कामाच्या दर्जात तडजोड केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची पाहणी करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीमध्ये दौरा केला. त्यास शहर अभियंता मोहन डगावकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते. या वेळी पार्कच्या दुसºया टप्प्याचेही शिल्लक काम उर्वरित कालावधीत पूर्ण करून मुलांची गैरसोय टाळण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी केल्या. तसेच पार्कच्या देखभालीचा खर्च डोईजड होऊ नये, यासाठी तिथल्या पार्टी लॉनच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी प्रशासनाला सुचवले. या वेळी पार्टी लॉनच्या जागेचे योग्य प्रकारे सपाटीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आणून त्यात सुधार करण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या. या वेळी उद्यानातील काही बाबीवरून महापौर जयवंत सुतार यांनीही ठेकेदाराला धारेवर धरून आवश्यक सूचना केल्या. तर शहर अभियंता मोहन डगावकर यांनी मानवी चेहºयाच्या पुतळ्यावरून ठेकेदाराला खडेबोल सुनावत त्यात सुधाराच्या सूचना केल्या.