संसार उघड्यावर, घरकुल योजनेंतर्गत दिलेल्या घराचं छप्पर कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:02 PM2019-08-09T14:02:55+5:302019-08-09T14:05:13+5:30
तसेच खारघर ग्रामपंचायतीने ३ वर्षांपूर्वी घरकुल योजनेअंतर्गत ही घरे बांधली होती.
पनवेल: खारघर हिलवरील फणसवाडी आदिवासी वाडीतील एका घराचे छप्पर कोसळून ते दोन घरांवर पडल्याने दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विशेष म्हणजे ९ ऑगस्ट जागातील आदिवासी दिनाच्या दिवशी हि घटना घडल्याने आदिवासी बांधवांच्या आनंदावर विरजण आले आहे.
या घटनेत सुनील मधे व बाळाराम पारधी किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच ही घटना सकाळी 8.30च्या सुमारास झाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
तसेच खारघर ग्रामपंचायतीने ३ वर्षांपूर्वी घरकुल योजनेअंतर्गत ही घरे बांधली होती, परंतु या घरांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप प्रभाग अ समिती सदस्य शत्रुघ्न काकडे यांनी केला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.