शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शेकापला रोखण्याची विरोधकांची धडपड

By admin | Published: November 18, 2016 3:33 AM

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड, रोहा, मुरुड, पेण, खोपोली, अलिबाग, उरण आणि माथेरान या

जयंत धुळप /अलिबागरायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड, रोहा, मुरुड, पेण, खोपोली, अलिबाग, उरण आणि माथेरान या नगरपरिषदांच्या थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीकरिता येत्या रविवारी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार सर्वत्र सुरू झाला आहे; परंतु प्रचारात उत्साह मात्र दिसून येत नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वरच्या स्तरावर विचारविनिमय करून केलेल्या आघाड्या आणि युत्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना अपेक्षेप्रमाणे विचारात घेतले नाही असा या आघाड्या आणि युत्यांमधील सर्वच राजकीय पक्षांमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुप्त सूर आहे, तर आपल्या घराण्यांच्या राजकीय प्रतिष्ठेकरिता नेत्यांनी केवळ आपलाच विचार केला, अशीही एक भावना कार्यकर्त्यांची आहे. परिणामी, यंदाच्या या नगरपरिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्यात ‘कार्यकर्त्यांची निष्ठा आणि राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा’ अशीच निवडणूक अनुभवास येत आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील या जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी नगरपरिषद निवडणुकीकरिता आघाडी करून निवडणुकीची रणनीती आधीपासून आखून कामास प्रारंभ केला. गेल्या ३० वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेली अलिबाग नगरपरिषद शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची, तर रोहा आणि श्रीवर्धन या नगरपरिषदा आ. सुनील तटकरे यांच्या प्रतिष्ठेच्या नगरपरिषदा आहेत. अलिबागमध्ये शेकाप आ. जयंत पाटील यांचे मेव्हणे प्रशांत नाईक हेच विद्यमान नगराध्यक्ष असून त्यांची या वेळची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुमारे महिनाभर आधीच जाहीर करून शेकापने उमेदवारी जाहीर करण्यात पहिली बाजी मारली. अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. नमिता नाईक यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे अलिबागकर नागरिकांना मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर शेकापचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक व्यक्तिगत पातळीवर ‘व्यक्ती’ म्हणून अन्य राजकीय पक्षांकडून नसलेल विरोध या नाईक यांच्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. शेकापला अलिबागमधून हद्दपार करण्याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन अलिबाग शहर संघर्ष समिती स्थापन करावी, असा विचार पुढे आला. महिनाभर खलबते झाली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीपर्यंत एकमत झाले नाही आणि अखेर उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर शिवसेनेने अलिबाग शहर संघर्ष समितीला जय महाराष्ट्र केला आणि शेकापविरोधी सर्वपक्षीय आघाडीत बिघाडी झाली. शिवसेनेने थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. सुशील पाटील यांच्यासह नगरसेवकपदाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. नगरसेवकपदाच्या सर्व म्हणजे १७ जागांकरिता उमेदवार उभे करता आले नाहीत, याचे खापर शिवसेनेने अखेर अलिबाग शहर संघर्ष समितीवरच फोडले आहे. शिवसेनेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अ‍ॅड. सुशील नाईक काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीबरोबर फारकत घेऊन शिवसेनेत दाखल झालेत. केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना मतदारांनी दिलेली अधिक मते आणि विधानसभेला सेनेच्या पारड्यांत टाकलेली मते हे अंकगणित, अलिबागचा विकास आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची प्रचारसभेच्या जोरावर थेट नगराध्यक्ष व पाच नगरसेवक निवडून येणार असा दावा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख दीपक रानवडे, शहरप्रमुख कमलेश खरवले यांचा आहे.