पनवेल पालिकेत महिलाराज, महिला बालकल्याण सभापतीसह तीन प्रभागांत महिलांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:13 AM2020-10-29T00:13:07+5:302020-10-29T00:13:44+5:30
Panvel News : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत चार प्रभाग समित्या, स्थायी समिती आणि महिला व बाळकल्याण सभापतीपदी भाजपच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समित्या, महिला व बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पालिकेत चार प्रभाग समित्या, स्थायी समिती आणि महिला व बाळकल्याण सभापतीपदी भाजपच्या सदस्यांची निवड करण्यात आली. चारपैकी दोन प्रभाग समितीपदी महिला नगरसेवकांची निवड करण्यात आल्याने, पनवेल महानगरपालिकेत महिलाराज पाहावयास मिळणार आहे.
महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर, अ प्रभाग समितीत अनिता पाटील, ब प्रभाग समितीत समीर ठाकूर, क प्रभाग समितीत हेमलता म्हात्रे तर ड प्रभाग समितीत सुशीला घरत यांची निवड करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेत महापौरपदी महिला विराजमान आहेत. या व्यतिरिक्त महिला व बालकल्याण सभापतींसह तीन प्रभागांत महिलांना संधी देण्यात आल्याने, पनवेल महानगरपालिकेत महिलाराज पाहावयास मिळणार आहे. बुधवारी या निवडणुका पार पडल्या. शेकापने दोन प्रभागांत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, भाजपची एकहाती सत्ता असल्याने चारही प्रभागांत भाजपचे उमेदवार निवडून आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.