‘सूर रायझिंग स्टार’मधून प्रतिभावान गायकांना संधी, कलर्स-लोकमत समूह उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:13 AM2018-01-18T01:13:44+5:302018-01-18T01:13:44+5:30
आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक
नवी मुंबई : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी ‘लोकमत’ समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते.
सुरांचे देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकमत आणि कलर्स वाहिनी आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’चे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता शिवविष्णू मंदिर सभागृह, वाशी बसडेपोच्या मागे होणार आहे. यामध्ये ४ वर्षांपुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.
विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली आहे, ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात.
सदरील होणाºया स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ जानेवारी रोजी सायं ४.३० वाजता लोकमत कार्यालय, २१,२२,२३, से. ३०, सानपाडा येथे होईल. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी ७०४५८८५०६४ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान संपर्क करावा. या कार्यक्रमात महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे.