शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

होर्डिंगच्या प्रस्तावास सत्ताधाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 3:40 AM

शहरात जाहिरात फलक लावण्याच्या दोन प्रस्तावांपैकी एकास राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध करून तो नामंजूर केला आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात जाहिरात फलक लावण्याच्या दोन प्रस्तावांपैकी एकास राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध करून तो नामंजूर केला आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशिष्ट कंपनीला काम न मिळाल्याने विरोध केल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. स्थायी समितीच्या १२ जुलैला झालेल्या सभेमध्ये जाहिरात फलक उभारण्यास परवानी देण्याचे दोन प्रस्ताव चर्चेसाठी आले होते. परंतु राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्यांनी ते प्रस्ताव एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये हे प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आले होते. सीबीडी अग्निशमन केंद्र, नेरूळ सेक्टर ६ मधील उद्यान, वाशी विभाग कार्यालय व कोपरखैरणे बस डेपो आवारामध्ये जाहिरात फलक उभारण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादीने विरोध केला. महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती न करता या ठिकाणी महापालिकेच्या विविध योजना, जनजागृतीपर फलक लावण्यासाठी त्याचा वापर करावा अशी भूमिका मांडली व बहुमताच्या बळावर तो फेटाळला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून पालिकेला वर्षाला ३ लाख ३० हजार व तीन वर्षामध्ये तब्बल १३ लाख ३० हजार रूपये उत्पन्न मिळणार होते. वास्तविक याच ठिकाणी यापूर्वी ठेका दिला होता, परंतु त्या कंपनीला यावेळी काम मिळाले नाही. ठरावीक कंपनीला काम मिळाले नसल्यानेच विरोधाची भूमिका घेतली असावी असा संशय निर्माण होईल अशी टीका शिवसेना नगरसेवकांनी केली, परंतु त्या टीकेकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. यापूर्वी जाहिरात फलकाचा ठेका कोणाचा होता व किती पैसे मिळाले हे तपासणे गरजेचे आहेत. आयुक्तांनी परिश्रम घेवून पालिकेचा फायदा होईल असा प्रस्ताव तयार केला असून त्यास विरोध करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. द्वारकानाथ भोईर यांनीही हा प्रस्ताव मंजूर करावा. प्रस्ताव फेटाळल्याने पालिकेचे नुकसान होईल अशी भूमिका व्यक्त केली. महापेचा प्रस्ताव मंजूर सीबीडी, नेरूळ, वाशी व कोपरखैरणेमध्ये जाहिरातीचा ठराव राष्ट्रवादी काँगे्रसने नामंजूर केला, परंतु महापे उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला जाहिरात फलक लावण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दोन्हीही प्रस्ताव जाहिरातीचे व पालिकेचे उत्पन्न वाढविणारे असूनही एका प्रस्तावास विरोध केल्याने राष्ट्रवादी काँगे्रसच्या हेतूविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.