सिडकोतील क्रिस्टलच्या नोकरभरतीला विरोध

By admin | Published: January 29, 2017 02:17 AM2017-01-29T02:17:34+5:302017-01-29T02:17:34+5:30

तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरविण्यासाठी सिडकोने क्रिस्टल एजन्सीची नियुक्ती केली आहे. यापूर्वीच्या ३२० जणांवर अन्याय करून नवीन भरती केली जात असल्याने

Opposition to the employment of crystals of CIDCO | सिडकोतील क्रिस्टलच्या नोकरभरतीला विरोध

सिडकोतील क्रिस्टलच्या नोकरभरतीला विरोध

Next

नवी मुंबई : तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरविण्यासाठी सिडकोने क्रिस्टल एजन्सीची नियुक्ती केली आहे. यापूर्वीच्या ३२० जणांवर अन्याय करून नवीन भरती केली जात असल्याने कामगारांनी सीबीडीतील तारा सेंटरबाहेर आंदोलन करून भरती प्रक्रिया बंद पाडली.
सिडकोने यापूर्वी अथर्व एजन्सीला मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका दिला होता. त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून जवळपास ३२० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत होते, पण संबंधित एजन्सीच्या कामाची मुदत जानेवारी अखेरीस संपत आहे. यामुळे क्रिस्टल कंपनीला मनुष्यबळ पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. ४३ क्लार्क व ३१ शिपाई १ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यासाठी संबंधित कंपनीने शनिवारी सीबीडी रेल्वे स्टेशनमधील तारा सेंटरमध्ये मुलाखती ठेवल्या होत्या. याविषयी माहिती मिळताच सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. नवीन ठेकेदाराने जुन्या कर्मचाऱ्यांनाच कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही तर भरती प्रक्रिया होवू दिली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
कामगार नेते श्याम म्हात्रे, काँगे्रस जिल्हा अध्यक्ष निशांत भगत, प्रभाकर जोशी व इतरांनी क्रिस्टलच्या व्यवस्थापनाची भेट घेतली. अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कामगारांना प्रथम नोकरीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली. पण संबंधित व्यवस्थापनाने १०८ जणांनाच भरती करण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. यामुळे त्या व्यतिरिक्त कोणालाही घेता येणार नसल्याचे सांगितले. परंतु सर्वांना कामावर घेतले नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण होवू दिली जाणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. यामुळे भरती थांबविण्यात आली. यावेळी सर्व कामगारांनी तारा सेंटरबाहेर एकत्रित येवून न्याय देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

जुन्या एजन्सीच्या कामाची मुदत संपत आल्याने सिडकोने नवीन एजन्सी नेमली आहे. पण त्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नसल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. व्यवस्थापनाशी भेटून प्रथम जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, अन्यथा ही प्रक्रिया होवू न देण्याचा इशारा दिला.
- श्याम म्हात्रे, कामगार नेते

Web Title: Opposition to the employment of crystals of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.