शुल्कवाढीच्या निषेधार्थ ठाण्यात केली निदर्शने

By Admin | Published: January 9, 2017 05:53 AM2017-01-09T05:53:11+5:302017-01-09T05:53:11+5:30

केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कांत वाढ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी ठाण्यातील मर्फी आरटीओ

Opposition parties protested against the hike in fees | शुल्कवाढीच्या निषेधार्थ ठाण्यात केली निदर्शने

शुल्कवाढीच्या निषेधार्थ ठाण्यात केली निदर्शने

googlenewsNext

ठाणे : केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कांत वाढ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी ठाण्यातील मर्फी आरटीओ कार्यालयाच्या आवारात मोटार वाहनचालकमालक प्रतिनिधी संघ व महाराष्ट्र आरटीओ कन्सल्टंट्स असोसिएशनने निदर्शने केली.
हे शुल्क वाढताना लहान वाहनांच्या शुल्कात ५० टक्के, तर मोठ्या वाहनांच्या शुल्कात जवळपास १०० टक्के वाढ केली आहे. यामध्ये २९ डिसेंबर २०१६ पासून सुधारणा केली असून त्याची अंमलबजावणी तत्काळ लागू केली. तसेच आजतागायत भरणा केलेल्या शुल्काचा फरक वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा विरोध करण्यासाठी असोसिएशनचे ठाणे शहर रोहित गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निषेध करण्यात आला. या वेळी राजू निकते, दत्तू मामा खेडुलकर, अवजड वाहतूक सेनेचे प्रसन्न आहेर आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रामधील सर्व कार्यालयांच्या आवारात निषेध नोंदवून पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition parties protested against the hike in fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.