गगराणी यांच्या बदलीला विरोध

By admin | Published: June 15, 2017 03:15 AM2017-06-15T03:15:30+5:302017-06-15T03:15:30+5:30

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या बदलीचा फटका सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची

Opposition to the return of Gagrani | गगराणी यांच्या बदलीला विरोध

गगराणी यांच्या बदलीला विरोध

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या बदलीचा फटका सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची बदली करू नये, अशी विनंती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून भूषण गगराणी यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गगराणी यांना सिडकोचा पदभार स्वीकारून जेमतेम एक वर्ष झाले आहे. या काळात त्यांनी विविध प्रकल्पांना गती दिली आहे. देशाचा प्रकल्प म्हणून पाहिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच सिग्नल यंत्रणांचे कामही पूर्ण झाले आहे. तळोजा येथे मेट्रोसाठी पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूणच पहिला टप्पा २0१८ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. तसेच सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गगराणी यांची बदली झाल्यास हे मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेरूळ-उरण रेल्वेमार्ग पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात गगराणी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत. गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न शासकीय स्तरावर सुटला असला तरी त्याची अंमलबजावणी सिडको स्तरावरून केली जाणार आहे. तसेच नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने गगराणी यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यांची बदली केल्यास या सर्व प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी किमान आणखी एक वर्ष तरी गगराणी यांना सिडकोतच ठेवावे, अशी विनंती आमदार मंदा म्हात्रे व आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Opposition to the return of Gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.