पनवेल आरटीओबाहेरील दलालांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:13 AM2017-07-20T04:13:39+5:302017-07-20T04:13:39+5:30

पनवेल प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात अर्जदारांची पनवेल प्रादेशिक कार्यालयाबाहेर

Order for action against brokers outside Panvel RTO | पनवेल आरटीओबाहेरील दलालांवर कारवाईचे आदेश

पनवेल आरटीओबाहेरील दलालांवर कारवाईचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रिक्षाचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात अर्जदारांची पनवेल प्रादेशिक कार्यालयाबाहेर गर्दी जमत असून याचा फायदा घेत दलाल आर्थिक व्यवहार करून परमिट वाटपाचे व्यवहार करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने १७ जुलै रोजी ‘रिक्षाचे परवाने दलालांच्या कचाट्यात’ या मथळ्याखाली बातमीदेखील प्रकाशित केली होती. यासंदर्भात परिवहन आयुक्त लक्ष्मण दरोडे यांनी अशाप्रकारच्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळंबोली पोलीस ठाण्याला अशा व्यक्तीची माहिती देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे .
मोटार वाहन विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यक्ती येत असल्याचा आणि ते कायदेशीर घ्यावयाच्या शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्र ारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे देखील प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पत्रान्वये परिवहन आयुक्तांनी पनवेल प्रादेशिक कार्यालयाला दिले होते. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १८ जुलै रोजी ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल येथील प्रादेशिक कार्यालयात पाहणी केली असता अनधिकृत एखादी व्यक्ती परिवहन कार्यालयात फिरताना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिवहन कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीकडून जादा पैसे उकळले असल्यास अशा व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे हेमांगिनी पाटील यांनी केली आहे.

Web Title: Order for action against brokers outside Panvel RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.