नवाळ्यातील बेकायदा बांधकामांच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: November 18, 2016 02:12 AM2016-11-18T02:12:54+5:302016-11-18T02:12:54+5:30
निर्मळ तलावाचे पावित्र्य नष्ट करु पाहणाऱ्या आणि हिंंदू ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या
वसई : निर्मळ तलावाचे पावित्र्य नष्ट करु पाहणाऱ्या आणि हिंंदू ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या नवाळ्यातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व्हे क्र.१५५ आणि १५६ मधील बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही बिल्डरांनी सर्व नियम धाब्यावर बसवून येथे उभारलेल्या इमारतींचे सांडपाणी सोडल्याने ते हा तलाव दूषित करते. त्यातच धार्मिक विधी उरकावे लागत आहेत. त्यामुळे या इमारती जमीनदोस्त करण्यात यावेत, अशी मागणी अनिल राऊत यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार या बांधकामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)