नवी मुंबई : सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. तुर्भे पूल ते नेरूळ दरम्यान खड्डे दुरूस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.फिफा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये आवश्यक ती कामे करण्यास सुरवात झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर सुधाकर सोनावणे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सायन - पनवेल महामार्गाची पाहणी केली. ठाणे-बेलापूर रोडचे शेवटचे टोक व महामार्गाची सुरवात यामध्ये असलेल्या एक किलोमीटर रोडची अत्यंत दुरवस्था झाली आहे.सानपाडा दत्तमंदिर पुलावर व पुलाखाली नियमित खड्डे असतात. यामुळे दोन महिन्यांपासून या परिसरामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अशीच स्थिती राहिली तर फिफा सामन्यांच्या वेळेला महामार्गावरील सर्व यंत्रणाच कोलमडण्याची शक्यता असल्याने पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. एक किलोमीटर अंतरावरील पूर्ण रोडचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. पुलाखाली व परिसरामधील बेवारस वाहने तत्काळ हटविण्यात यावी. पुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अधिकाºयांकडून त्यांचे नियोजन ऐकून घेवून काय केले पाहिजे याविषयी आदेश यावेळी देण्यात आले.मुंबई व ठाणेकडून फुटबॉलप्रेमी महामार्गासह ठाणे बेलापूर रोडने येणार आहेत. यामुळे दिघा ते नेरूळ व वाशी पासून स्टेडियमपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी सुशोभीकरण केले जावे. जगाच्या नकाशावर नवी मुंबई झळकणार आहे. यामुळे आवश्यक ती सर्व कामे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये पुढील एक महिन्यात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत. नियोजनामध्ये त्रुटी राहू नयेत असेही त्यांनी सूचित केले.
महामार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश, तुर्भे ते नेरूळ रोडचे सुशोभीकरणाच्याही सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:48 AM