प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:04 AM2020-05-16T03:04:01+5:302020-05-16T03:04:08+5:30

काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू, जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत आहे.

 Orders for action against polluting companies | प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश

Next

अलिबाग : पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात वायुप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. अशा वायुप्रदूषण करणाºया कंपन्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू, जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत आहे. नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी पालकमंत्री तटकरे यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची तातडीने दखल घेत पालकमंत्री तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांचे आदेश मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रायगड जिल्हा प्रादेशिक अधिकाºयांनी प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी पाहणी केली. दोषी कंपन्यांवर लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Web Title:  Orders for action against polluting companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.