पनवेल : खारघर सेक्टर - ७ मध्ये रॉयल ट्युलिप हे तारांकित हॉटेल आहे. येथील भूखंड क्र मांक २५ व २६ या जागेवर सार्वजनिक वापरासाठी असणारी जागा अनधिकृतपणे बळकावणाऱ्या हॉंटेल मालकाविरु द्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने खारघर पोलीस ठाण्यात पत्र देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या संघर्ष सामाजिक संघटनेने छेडलेल्या या लढ्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला असून खारघरमधील सर्वसामान्य नागरिकांनी रविवारी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत रॉयल ट्युलिप हॉटेलचे मालक व भागीदार सुरेश वधवा, पूनम वधवा, ऋषभ वधवा आदींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हॉंटेल मालकाच्या वतीने सार्वजनिक वापराचा पाच मीटर रु ंदीचा रस्ता हडप करण्यात आला आहे. भूखंड क्र मांक २५, २६ मध्ये असणाऱ्या या रस्त्याची आजही सिडकोच्या दप्तरी नोंद आहे. तरी देखील हा रस्ता रॉयल ट्युलिपने अनधिकृतपणे बळकावला असल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी केला आहे. संबंधित घोटाळ्याप्रकरणी दोषी सिडको अधिकाऱ्यांवरदेखील फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी आम आदमी पक्षाचे रवी श्रीवास्तव, शेकापचे विजय पाटील, किरण पाटील आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व खारघरमधील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)च्संबंधित तक्र ारीनुसार प्रकरणाची चौकशी केली जाईल, त्यानंतरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी दिले.
रॉयल ट्युलिपविरोधात संघटना एकवटल्या
By admin | Published: May 11, 2015 1:51 AM