उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:52 PM2023-08-16T14:52:28+5:302023-08-16T14:52:39+5:30

या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

Organized various patriotic activities in the 'Majhi Mati, Maja Desh' campaign organized in Uran | उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन 

उरणमध्ये आयोजित 'माझी माती, माझा देश'  अभियानात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन 

googlenewsNext

मधुकर ठाकूर -

उरण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर- वीरांगणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात "माझी माती, माझा देश" हे देशभक्तीपर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

याचाच एक भाग म्हणून उरण नगरपरिषद सौजन्याने 'माझी माती, माझा देश' अभियानांतर्गत शिलाफलकाचे लोकार्पण व शहीद वीरांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात "कोविड योद्धा" म्हणून  सेवा बजावलेल्या उरण नगरपरिषद शाळेमधील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित शिला फलकाचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.यावेळी रहाळकर मैदानावर  वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षा रोपण केले. अमृत वाटिका तयार करण्यात आली.

तसेच  या महाभियानात सर्वांनी सहभागी व्हा आणि शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करा असे भावनिक आवाहन करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उनपचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखपाल  सुरेश पोस तांडेल , नगर रचनाकार सचिन भानुसे, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, कर निरीक्षक संजय ढापसे, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, तसेच माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी गटनेते रवी भोईर, माजी नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, जसिम गॅस व उरण नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Organized various patriotic activities in the 'Majhi Mati, Maja Desh' campaign organized in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.