मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

By नामदेव मोरे | Published: September 25, 2024 05:01 PM2024-09-25T17:01:05+5:302024-09-25T17:01:43+5:30

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन :समाजात दुफळी निर्माण होणे राज्याला भुषणावह नसल्याचे मत

Our commitment to provide lasting reservation to the Maratha community | मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भुषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजीत मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा समाजाची चळवळ अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे उभी राहिली. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. मराठा समाजाच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. आता वेगवेगळ्या आरक्षणाची मागणी होत आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घ्यायचा व तो न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरफट होईल. मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे राहणे राज्यासाठी भूषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट आहे. सारथीच्या माध्यमातून युपीएससी व एमपीएससीमध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक घडविले असल्याचेही स्पष्ट केले.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. नाशिकमधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसामध्ये बैठक आयोजीत केली जाईल. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माथाडी कामगारांच्या नावाने चुकीचे काम करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कोणताही कायदा सरकार करणार नाही. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी यावेळी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मेळाव्यास आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.


देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे नामकरण करणार.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न मार्गी लावणार.

नाशिक येथील माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसात बैठक बोलावणार.

नवी मुंबईतील गृहप्रकल्पात कामगारांना प्राधान्य देण्याविषयी प्रयत्न करणार.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविले, ८४०० कोटीचे कर्जवाटप.

सारथीच्या माध्यमातून १२ आयएएस, १८ आयपीएस व एमपीएसीमध्ये ४८० उमेदवार यशस्त्री झाले.

मराठा समाजासाठी होस्टेलची सुविधा, होस्टेल न मिळणारांना ७ हजार रुपये निर्वाह भत्ता.

माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांचा बंदोबस्त करणार.

माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कायदा करणार नाही.

Web Title: Our commitment to provide lasting reservation to the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.