नवी मुंबई : दुकानांसमोरील मार्जिनल स्पेस खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बेकायदेशीररीत्या भाड्याने देत दुकानदार हजारो रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत, तर काही ठिकाणी हॉटेलचालकांनी या जागेवर टेबल, खुर्च्या मांडून हॉटेल थाटले आहे. याकडे सिडको आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना ये-जा करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील रेल्वेस्थानक भागातील मार्केट आणि रहिवासी भागातील इमारतींखालील दुकानासमोर नागरिकांना आणि गिºहाइकांना ये-जा करण्यासाठी मोकळ्या जागा सोडण्यात आल्या आहेत. या जागेवर अनेक दुकानदारांनी अतिक्र मण केले होते. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाया करून मार्जिनल स्पेसच्या जागा अतिक्रमणमुक्त केल्या होत्या. मुंढे यांची बदली झाल्यावर काही ठिकाणी पुन्हा अतिक्र मणे करण्यात आली आहेत. काही दुकानदारांनी वडापाव, पावभाजी, ज्यूस सेंटर, दाबेली, इडली डोसा विक्रेते, पाणीपुरी यासारख्या विविध खाद्यपदार्थ विक्री करणाºया फेरीवाल्यांना दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसच्या जागा भाड्याने दिल्या आहेत. मार्जिनल स्पेसच्या जागेच्या भाड्यापोटी प्रत्येक फेरीवाल्याकडून दरमहिन्याला हजारो रुपये भाडे घेतले जात आहे. रेल्वे स्थानकातील आणि स्थानकाबाहेर सिडकोने निर्माण केलेल्या मिनी मार्केटमध्ये हॉटेल थाटण्यात आली आहेत. हॉटेलसाठी जागा अपुरी पडत असल्याने मार्जिनल स्पेसवर टेबल, खुर्च्या मांडून हॉटेल थाटण्यात आली आहेत. सिडको आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान मार्जिनल स्पेसवर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना साहित्य लपविण्यासाठी दुकानात जागा देऊन कारवाई दरम्यान फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यात येत आहे. मार्जिनल स्पेसवर विविध सुरू असलेल्या व्यवसायांमुळे नागरिकांना ये-जा करणे जिकरीचे झाले आहे. नेरुळ, सीबीडी, वाशी आदी भागातील रेल्वे स्थानकांजवळील मार्केटमध्ये टेबल, खुर्च्या थाटण्यात येत असल्याने या परिसरांना खाऊ गल्लीचे रूप येत असून, नागरिकांना ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागामधील दुकानासमोरील मार्जिनल स्पेसवर खाद्यपदार्थाच्या विक्रीसाठी दुकानदारांनी दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसमधील जागा भाड्याने दिल्या आहेत. महापालिका आणि सिडकोने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.रेल्वेस्थानके आणि इतर ठिकाणी असलेल्या दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवसाय थाटण्यात आले असून, महापालिका आणि सिडकोचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कारवाया करून मार्जिनल स्पेसच्या जागा रिकाम्या करून घ्याव्यात.- सचिन गोळे, नेरु ळ