प्राची सोनवणे नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी स्टॉल्सचे वितरण केले आहे; परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी नियमबाह्यपणे स्टॉल्स भाडेतत्त्वावर दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे व संबंधितांना योग्य सूचना देण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.महानगरपालिका, सिडको व इतर शासकीय संस्था अपंग, युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यांना एसटीडी, पीसीओ, झेरॉक्स, फॅक्स बुथ, लॉटरी तिकीट विक्री, वृत्तपत्रे विक्र ी, पानविडी स्टॉल्स, चर्मकार यांनी महापालिकेने दिलेल्या अटीनुसार विशिष्ट व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, या जागेचा गैरवापर करून या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. महापालिकेकडून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकी स्टॉलकरिता ५ चौ.मी. जागा देण्यात आली असून, या जागेतच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी स्टॉलधारकांनी या ठरवून दिलेल्या व्यवसायांव्यतिरिक्त इतर व्यवसाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेकांनी हे स्टॉल्स भाडेतत्त्वावर दिले आहेत. सीबीडी बस डेपोसमोरील स्टॉल्सचा वापर ट्रॅव्हल एजन्सीकरिता केला जात असून, या ठिकाणी तिकिटांच्या ग्राहकांकडून पैसे उकळले जात असून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या अटीनुसार अनुज्ञापत्रामध्ये नमूद केलेल्या जागेवर अनुज्ञापत्रधारकाचा मालकी हक्क, भाडेकरू किंवा अन्य कोणताही हक्क राहणार नाही. ही जागा इतर कोणासही भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय थाटल्याचे चित्र पाहायला मिळते. नियमानुसार स्टॉलधारकांना 0.३ मीटर उंचीच्या नामफलकाव्यतिरिक्त इतर कोणताही जाहिरात फलक प्रदर्शित करता येणार नाही, असे असतानादेखील विविध मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती, यात्रा कंपन्यांची माहिती देणारे फलक लावलेले पाहायला मिळतात. नेरु ळ, सानपाडा, वाशी, बेलापूर आदी परिसरातील चर्मकारांनी या स्टॉल्सवर दुकाने थाटली असून रस्त्याची अडवणूक केल्याचे चित्र पाहायला मिळते.महापालिकेच्या वतीने जवळपास २0 हून अधिक नियम व अटी लागू केल्या असून, त्यांचे पालन केले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते.अशा प्रकारे जागेचा गैरवापर करणाºया व्यावसायिकांना याबाबत विचारणा केली असता, महापालिका अधिकारी तसेच पोलिसांना याविषयी माहिती आहे; पण आमच्यावर कारवाई केली जात नाही, असे निर्भयपणे सांगण्यात आले. मालमत्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन करणाºयांवर रीतसर कारवाई केली जात असल्याचा खोटा दावा करण्यात आला.
स्टॉल्सधारकांचा ‘कारभार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:24 IST