नवी मुंबई : वयोमानामुळे किंवा हृदयाच्या ठोक्यांची गती नियमित राखण्याची क्षमता कमकुवत झाल्यास पेसमेकरची गरज भासू शकते. अशा प्रकारच्या हानीमुळे हृदयाचे ठोके सर्वसामान्य गतीपेक्षा मंद पडू शकतात किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये दीर्घ अवकाश निर्माण होऊ शकतो.त्यामुळे अशा परिस्थितीत पेसमेकरमुळे हृदयाची गती नियमित राखण्यास मदत होते. अशा वेळी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचा सल्ला फोर्टीस रुग्णालयाचे सीनिअर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रमुख आणि कॅथ लॅबचे संचालक डॉ. ब्रजेश कुमार कुंवर यांनी दिला आहे.ब्रॅडिकार्डिया आणि हार्ट ब्लॉक या आजारांवर पेसमेकर बसविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो, तसेच अर्हिदमियाच्या (हृदयाचे ठोके अनियमित पडणे) समस्येवर उपचार करण्यासाठी आर्ट्रियल फायब्रिलेशन ही वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली असल्यास, डॉक्टर पेसमेकर लावून घेण्याचा सल्ला देऊ शकतात.पेसमेकर एका विशिष्ट प्रक्रियेनंतर हृदयाच्या ठोक्यांची गती नियमित राखण्यास मदत करते. जन्मजात हृदयविकार असलेल्या व्यक्तींनाही किंवा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना डॉक्टरांकडून पेसमेकर बसविण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.लहान मुले, किशोरवयीन मुले आणि प्रौढ व्यक्ती पेसमेकरचा वापर करू शकतात. पेसमेकर बसविण्याचा सल्ला देण्यापूर्वी डॉक्टर्स तुमच्यामध्ये काही लक्षणे तपासतात.तपासणी करून हृदयाच्या चाचण्यांचे परिणाम विचारात घेतले जाते. अर्हिदमियाचे निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्यांचा वापर केला जातो. यासाठी हॉल्टर आणि इव्हेन्ट मॉनिटर, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इकोकार्डिओग्राफी, इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टड, स्ट्रेस टेस्ट या चाचण्यांपैकी एखादी चाचणी किंवा अधिक चाचण्या करून घेतल्या जाऊ शकतात, त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास धोका टाळण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असल्याचे डॉ.ब्रजेश कुमार कुंवर यांनी सांगितले.
पेसमेकरमुळे हृदयाची गती नियमित राखण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:11 AM