मयुर तांबडे
पनवेल : तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे.आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती तहसीलदार सानप यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे.शेतकºयाला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.पनवेल तालुक्यात एकूण ८हजार १५० हेक्टर शेतीचे पीक घेतले जाते. यापैकी पावसामुळे काहीशेती पाण्यात गेली आहे. शेतातपाणी साचल्याने पिक कुजलेआहे. काही ठिकाणी भातालाकोंब फुटले आहेत. जुलै २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक हजार दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे शासनाला जमा करण्यात आलेले आहेत.आॅक्टोबरमध्ये जवळपास २०० हेक्टर भातपिकाचे नुकसान झालेले आहे. तालुक्यातील ७ शेतकरयानी पीक विमा उतरवला होता. त्यांनी पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेले आहेत.