शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

पालघरवासियांचा टाहो मुख्यमंत्री ऐकणार?

By admin | Published: May 16, 2017 12:47 AM

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे अनेक प्रकल्प पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, आदिवासींच्या उरावर लादले जात

हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे अनेक प्रकल्प पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, आदिवासींच्या उरावर लादले जात असून शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी जबरदस्तीने बळकावून मच्छीमारीचा परंपरागत व्यवसायच उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. पोफरण प्रकल्पग्रस्तांना १२ वर्षानंतर आजही सोयीसुविधा आणि हक्कासाठी न्यायालयीन लढा लढावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि मच्छीमाराना संपवूनच शासनाची भूक शमणार आहे का? असा उद्वेगपूर्ण सवाल पालघरवासिय दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत. अणू ऊर्जेची देशाला असलेली गरज आणि त्यातून देश स्वयंपूर्ण होणार असल्याच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पोफरण-अक्करपट्टीवासीयांनी आपल्या घरादारावर नांगर फिरवून सर्व जमिनी शासनाकडे सुपूर्द केल्या. बागायती क्षेत्रातील फळा-फुलांनी सजविलेली घरे ताब्यात घेऊन शासनाने या प्रकल्पग्रस्तांना मात्र नवीन पोफरण येथील खुराडे वजा घरात नेऊन फेकले आहे. आज त्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आदींसाठी न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे उभे राहून तत्कालीन सरकारच्या नावाने जे लोकप्रतिनिधी तेव्हा ओरडत होते. तेच आता सत्तेत आल्यानंतर मात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात आहेत. या सारखे आपले दुसरे दुर्दैव काय असू शकते? पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास, सूर्यप्रकल्प, वांद्री प्रकल्प आदी प्रकल्पग्रस्त आजही उध्वस्त असून जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि पुनर्वसनासाठी त्यांना आजही रस्त्यावर येऊन आंदोलने करावी लागत आहेत. ही भयावह, उध्वस्त करणारी वस्तुस्थिती जिल्हावासीय अनुभवत असताना पुन्हा विकासाच्या नावाखाली वाढवणं, फ्रेट कॅरीडोर, बुलेट ट्रेन इ. सारखे एका पाठोपाठ एक प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन करू पहात आहेत. आणि त्यांचे दूरगामी परिणाम मात्र शेतकरी, मच्छिमार, गरीबांना भोगावे लागत आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॅरिडोर हा मुंबई (जेएनपीटी) ते दिल्ली या १५६५ किमी लांबीचा मालवाहतूक रेल्वे प्रकल्प २०१४ पासून सुरू झाला असून आजही तो अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीचे मोबदले आजही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.या व्यतिरिक्त वाढवणं बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात ५ हजार एकराचा भराव घालण्यात येणार असून त्यासाठी १ लाख ९० हजार टन दगडांचा वापर करण्यात येणार आहे. सुमारे ५०० एकर जमीन रेल्वे, रस्ते इ. साठी संपादित करण्यात येणार असल्याचे कळते. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सूर्याप्रकल्पांतर्गत असलेल्या कवडास व धामणी धरणातून २९९ दलघमी पाणी साठ्यापैकी २२६ दलघमी पाणी बिगर सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी १८० दलघमी पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर कडे वळविण्यात आले आहे. परिणामी या प्रकल्पांतर्गत असलेली १९ हजार एकर जमीन सिंचनविहिन होणार आहे. अशी एका पाठोपाठ संकटांची मालिका जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमाराना उध्वस्त करायला निघाली आहेत. पोफरण-अकरपट्टी चे वास्तव आमच्या डोळ्यासमोर असताना आमची एक इंचही जागा ह्या कुठल्याही प्रकल्पाला देणार नाही यासाठी शेतकरी-मच्छिमार पेटून उठला असून प्रशासनाने जबरदस्ती केल्यास याविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा संकल्प जिल्ह्यातील बाधितांना उभारला आहे.या प्रकल्पासाठी पालघर तालुक्यातील पालघर, गोठणपुर, नवली, माहीम,केळवे रोड, रोठे, कर्दळ, कपासे, माकुणसार, उंबरपाडा, नंदाडे, सफाळे, सरतोंडी, करवाळे, वाढीव, सरावली, उमरोळी, नेवाळे, राणीशिगाव, बोईसर, दांडी पाडा, खैरापाडा, पंचाळी, बिरवाडी ही गावे बाधित होणार आहेत. डहाणूतील वाणगाव, घोलवड, चिखले, कसारा, आंबेवाडी, वाकी, नंदारे, जुन्नरपाडा, डहाणू, मानफोड, पाटील पाडा, सरावली, आगवन, पळे, आसनगाव, कापशी बाधित होणार आहे.वसई तालुक्यातील शिरगाव,बिलालपाडा, सारजामोरी, मोरी, कसराळी, राजीवली, धानीव, चंदूपाडा, गोखीवरे, जुचंद्र, शिलोत्तर, ससूनवघर बाधित होणार आहे.तलासरी तालुक्यातील बोरीगाव, वेवजी, ब्राम्हण पाडा मुंबई वडोदरा ह्या एक्स्प्रेस मार्गासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वसई,तलासरी व वाडा तालुक्यातील ७० गावातील शेतकऱ्यांच्या लागवडी खालील जमिनी बाधित होणार आहेत.पालघर तालुक्यातील मासवण, धुकटन, काटाळे, वाकडी, घाटीम, वैती, नवघर, पेनंद, सोनावे, गिराळे, पारगाव, नगावे, वसरोली, गोवाडे, वंदिवाली, किराट, बोरशेती, लालोंडे, नागझरी, निहे, लोवरे, साखरे, दहिसर तर्फे मनोर, खामलोली, रावते, चिंचारे, नावझे ही २७ गावे बाधित होतील.डहाणू तालुक्यात गंजाड, रणकोल, ऐने, सोमनाथ, धनिवरी, तलोठे, पुंजावे, गणेशबाग, चिंचाळे, नवनाथ, चदनवाड, ब्राम्हवणवाडी, आवंढाणी, दाभोन, वंकास अशी ५१ गावे अंतर्भूत आहेत.वसई तालुक्यात मांडवी, चांदीप, कोशिंब, खारडी, डोलीव, काशिडकोपर, शिरसाड, नावसाई, भाताने, आडने भिनार, अंबोडे, कळंभोण आदी १४ गावे या एक्सप्रेस वे च्या जमिनी संपादित होणाऱ्या गावात अंतर्भूत आहेत.तलासरी तालुक्यातील तलासरी, सावरोली, आंबेशेतगाव, मसान पाडा, बोरमाळ, सूत्रकार, कोचाई, वडवली, सावते, आवारपाडा, कवाड अशी ११ गावे अंतर्भूत आहेत.वाडा तालुक्यातील बोराड, केळठन, निंबवली अशी ३ गावे अंतर्भूत आहे.या मध्ये सूर्याप्रकल्पातर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील जमिनींचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त मुंबई अहमदाबाद असा सहापदरी राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाची आवश्यकताच काय? असा प्रश्न बाधित शेतकऱ्याकडून विचारला जात आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ५०८ किमी लांबीचा व ९६ कोटींच्या खर्चाचा रेल्वे मार्ग प्रकल्प असून चार तालुक्यातील ५५ गावाच्या शेतामधून धडाडत जाणार आहे.पालघर तालुक्यातील वरखुटी, नवली, कमारे, वेवूर, घोलविरा, अंबाडी-शेलवली, नंडोरे, मोरवाडी, पडघे, जलसार, मिठागर, टेम्भिखोडावे, मांडे, शिलटे, विराथन बु, विराथन खु, रामबाग, केळवे रोड, रोठे, बेटेगाव, मान, वाळवे, शिगाव, हनुमान नगर, कल्लाळे, खिनवडे अशी २७ गावे अंतर्भूत आहेत.डहाणू तालुक्यातील जामशेत, जीतगाव, आंबेसरी, गागणगाव, धामणगाव, घाडने, कोमगाव, चंद्रनगर, वाणई, गोवणे, दाभणे, डहने, कोटबी, चरी, आसवे, वसंतवाडी, गोरवाडी, पारसवाडी, मणीपूर अशी २० गावे अंतर्भूत आहेत.तलासरी तालुक्यातील तलासरी, सावरोली, वरवाडा, उपलाट, काजळी, आच्छाड, वडवली, कवाडा अशी ८ गावे अंतर्भूत आहेत.