कर्जतमधील पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

By admin | Published: July 3, 2017 06:38 AM2017-07-03T06:38:58+5:302017-07-03T06:38:58+5:30

तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली

Pali-Bhitivali dam overflow in Karjat | कर्जतमधील पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

कर्जतमधील पाली-भूतिवली धरण ओव्हरफ्लो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेला पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरून गेला आहे. धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे हे धरण जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेला भरून वाहू लागले. सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्यातील या धरणावर मात्र पर्यटकांना पूर्णत: बंदी आहे.
नेरळ-कर्जत रस्त्याच्या भिवपुरी रोड गावाच्या समोर पाली भूतिवली धरण असून, २००३मध्ये या धरणाचा मुख्य बांध घातला गेल्यानंतर पावसाळ्यात जलाशयात पाण्याचा साठा झाला होता. त्या वेळी आणि आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या ११०० हेक्टर शेतीला सोडण्यासाठी कालवे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी आजतागत शेतीसाठी देण्यात आले नाही. परिणामी, ते पाणी आजही तसेच पडून असते. धरणातील साठून असलेले पाणी मोठ्या प्रमाणात तसेच राहत असल्याने ३५ दशलक्षघन मीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. त्यामुळे या वर्षी पावसाचा जोर चांगला असल्याने अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने आपली पातळी गाठली आणि राज्यात कृषी दिन साजरा होत असताना रविवारी सकाळी धरण ओव्हरफ्लो झाले. तो अनुभव धरणाच्या खाली असलेल्या आसल, भूतिवली या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनुभवला.
धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी पाहण्यासाठी असंख्य लोक जमले होते. त्या वेळी उपस्थित असलेले आरपीआय आठवले गटाचे तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड यांनी आपण पहिल्यांदाच असा धरण भरून वाहताना अनुभव घेतला. त्या वेळी फेसाळते पाणी पाहून त्यात भिजण्याचा अनेकांना उत्साह दिसून आला; पण त्या सर्वांना ग्रामस्थांनी अडविले. कारण, ज्या सांडव्यातून पाणी रविवारी सकाळी खाली कोसळले त्या सांडव्याचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी, त्या सांडव्याखाली असलेल्या पायऱ्यांवर बसून अनुभवण्यासाठी पर्यटकांना सध्यातरी बंदी आहे. कारण ते काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आणि वर्षासहलप्रेमींना बंदी आहे. धरणाच्या जलाशयात आजपर्यंत बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या किमान १० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. पाटबंधारे विभागाने आणि नेरळ पोलीस दलाने या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पाली-भूतिवली धरणात यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. आम्ही पर्यटकांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन पाली-भूतिवली धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.
- विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

Web Title: Pali-Bhitivali dam overflow in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.